Friday 13 September 2013

All WebSite Information



            ALL WEBSITE INFORMATION




www.itokri.com: महत्त्वाची शॉपिंग करायची आहे पण पुरेसा वेळ नाही. अशावेळी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट उपयोगी ठरतात, पण भारतीय स्वरुपाच्या वस्तू,पारंपरिक ड्रेस, हस्तकला अशा वस्तू खरेदी करायची असल्यास ‘आयटोकरी’ डॉट कॉम एक चांगला पर्याय आहे. वेबसाइटचे होमपेज कलात्मक पद्धतीचे असून लक्ष वेधून घेते. याठिकाणी इंटरेस्टिंग,कल्पक,मन प्रसन्न करणारे प्रोडक्ट मिळतात. होमपेजवर तुम्हाला कपडे, अँक्सेसरीज,बॅग्स, कला आणि चित्रपट,डिजिटल डिझाइन्स सारखे पर्याय असून यामधून तुम्ही तुमच्या आवडीचे साहित्य खरेदी करू शकता. वेबसाइटची कल्पकता वस्तूंना दिलेल्या नाव आणि विवरणावरुन दिसून येते. बहुतांश वस्तूंचे वर्णन कवितेच्या स्वरूपात आहेत. कपड्यांमध्ये तू तू मैं मैं, मिरचीवाली, खोटे सिक्केसारखे नावाचे पर्याय आहेत.


www. quillpad.in : एखाद्या भारतीय भाषेत लिहून त्याचा अनुवाद होऊन देवनागरी लिपीत आल्यास किती बरे होईल, असा विचार तुम्ही करत असाल तर हे संकेतस्थळ तुमच्यासाठीच आहे. क्विलपॅड एक ऑनलाइन टायपिंग टूल आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला 10 भारतीय भाषांमध्ये संवाद करता येईल. या भाषांमध्ये हिंदी, गुजराती, तामिळ, तेलगू, कानडी, मल्याळम, मराठी, पंजाबी, बंगाली आणि नेपाळी भाषेचा समावेश आहे. या भाषांचे ऑनलाइन एडिटर अनुवादासाठी तुमची मदत करतील. उदाहरणार्थ एखाद्या भाषेत ‘तुम्ही कसे आहात’ असे लिहायचे असेल तर तुम्हाला त्या भाषेवर क्लिक करून रायटिंग स्पेसमध्ये यावे लागेल. येथे तुम्हाला हिंग्लिशमध्ये मेसेज टाइप करावा लागेल, tumhi kase aahat तुम्ही हे टाइप करताच तुम्हाला ज्या भाषेत लिहायचे होते ती ट्रांसक्रिप्ट होऊन समोर येईल. हे शिकण्यासाठी यामध्ये डेमो ऑप्शनही आहे. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला आपला मेसेज सोशल नेटवर्किंग साइट्सवरही पाठवता येईल.


www.drawcentral.com: आपल्यापैकी काहीजण उत्कृष्ट चित्रे रेखाटतात. पेन्सिल स्ट्रोकने आकर्षक आणि सुंदर व्यंगचित्रे चितारतात. जर तुम्हालादेखील अशा पद्धतीची कला आवडत असल्यास हे संकेतस्थळ नक्की पाहण्यायोग्य आहे. या साइटची विशेष कौशल्ये पाहून ही साइट तुमच्या बुकमार्कमध्ये नक्की सहभागी होईल. ही साइट अँडम वॉटकिन्स संचलित करतात. ते स्वत: प्रसिद्ध टॉट आर्टिस्ट आहेत. नव्याने चित्रकला शिकत असलेल्यांना या साइटवर विविध टिप्स, ट्रिक्स दिल्या जातात. नवशिके ते व्यावसायिक चित्रकार सर्वांनाच उपयोगी ठरेल अशी ही साइट आहे. याच्या मदतीने तुम्ही ड्रॉइंग स्किल सुधारू शकता. तसेच चित्रकलेला नवा आयाम देऊ शकता. सोप्या सोप्या चित्रातून सुरुवात करत वॉटकिन्स कठीण चित्रकलेचे मार्गदर्शन करतात. पेन्सिल आर्ट शिकणार्‍यांसाठी या ठिकाणी कार्टून, व्यक्ती, प्राणी, निसर्ग असे विविध प्रकारचे काम पाहावयास मिळतात.


www.shockwave.com: 1998 मध्ये सुरू करण्यात आलेली ही गेमिंग साइट दररोज आपल्या यूर्जसला ऑनलाइन गेमिंगचा अनुभव देते. 2006 एमटीव्ही नेटवर्क्‍सचा हिस्सा झालेल्या या साइटवर 1800 पेक्षा जास्त गेम्स आहेत. आणि प्रत्येक आठवड्याला यात नव्या गेमची भर पडत असते. ही एक अशी गेमिंग साइट आहे जी तुम्ही एकदा तरी पाहिली पाहिजे. या साइटवर टूडे फन, व्हिडिओ, फोटो, गेम्ससारखे आयकॉन आहेत. यावर क्लिक करून त्यासंदर्भात जाणून घेऊ शकता. बेवसाइटवर उपलब्ध असणारे गेम्स साइनअप न करता सुद्धा पाहू किंवा खेळू शकता. येथून गेम्स डाउनलोड देखील करता येते. साइटवर गेम्ससाठी दिलेले रेटिंग आणि ती रिलीज झाल्याची तारीख सुद्धा उपलब्ध असते. त्याचप्रमाणे किती यूर्जसनी ती खेळली आहे दे देखील जाणून घेता येते. आपल्या आवडत्या प्रकारानुसार गेम शोधता येतात.


www.followupthen.com: एखादी अपॉइंटमेंट किंवा कार्यक्रमाची आठवण ठेवण्यासाठी तुम्ही ई-मेलची मदत घेता काय? जर अशी मदत घेत असाल तर तुमच्यासाठी फॉलोअप वेबसाइट मदतीची साइट ठरेल. ही साइट तुम्हाला योग्यवेळी रिमाइंडर देईल. या साइटवर एकदा साइनअप केल्यानंतर पुन्हा साइटवर जाण्याची गरज भासत नाही. किती वेळ आधी तुम्हाला रिमाइंड करायचे हे एकदा सेट झाल्यावर त्या वेळी त्यासंदर्भात आठवण करून दिली जाते.
आपल्याला कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा रिमाइंडर हवा हे देखील साइटवर नोंद करता येते. या साइटवर साइन अप मोफत असून रिमाइंडरसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. व्यग्र वेळापत्रक असणार्‍यांसाठी ही साइट अत्यंत उपयोगी आणि वेळ वाचवणारी ठरते.


www. quillpad.in : एखाद्या भारतीय भाषेत लिहून त्याचा अनुवाद होऊन देवनागरी लिपीत आल्यास किती बरे होईल, असा विचार तुम्ही करत असाल तर हे संकेतस्थळ तुमच्यासाठीच आहे. क्विलपॅड एक ऑनलाइन टायपिंग टूल आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला 10 भारतीय भाषांमध्ये संवाद करता येईल. या भाषांमध्ये हिंदी, गुजराती, तामिळ, तेलगू, कानडी, मल्याळम, मराठी, पंजाबी, बंगाली आणि नेपाळी भाषेचा समावेश आहे. या भाषांचे ऑनलाइन एडिटर अनुवादासाठी तुमची मदत करतील. उदाहरणार्थ एखाद्या भाषेत ‘तुम्ही कसे आहात’ असे लिहायचे असेल तर तुम्हाला त्या भाषेवर क्लिक करून रायटिंग स्पेसमध्ये यावे लागेल. येथे तुम्हाला हिंग्लिशमध्ये मेसेज टाइप करावा लागेल, tumhi kase aahat तुम्ही हे टाइप करताच तुम्हाला ज्या भाषेत लिहायचे होते ती ट्रांसक्रिप्ट होऊन समोर येईल. हे शिकण्यासाठी यामध्ये डेमो ऑप्शनही आहे. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला आपला मेसेज सोशल नेटवर्किंग साइट्सवरही पाठवता येईल.


www. weavesilk.com - तुम्ही जर कार्यालयीन कामे करून कंटाळले असाल आणि थकवा जाणवत असेल तर हे संकेतस्थळ तुमच्यासाठीच आहे. या संकेतस्थळावर जाऊन काही वेळासाठी तुम्हाला बरे वाटेल. संकेतस्थळाचा मखमली अंदाज तुम्हाला पुन्हा तरतरीत करेल. या संकेतस्थळाचा वापर करणे खूप सोपे आहे.
संकेतस्थळाच्या होम पेजवर जा आणि क्लिक अँड ड्रॅग ऑप्शनची निवड करा. माउसच्या मदतीने सिल्की वेब आपल्या स्क्रीनवर तयार करा. हे संकेतस्थळ तुम्हाला स्वत:ची सर्जनशीलता दाखवण्याची पूर्ण संधी देते. क्लिक आणि ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची मखमली लाटा आपल्या स्क्रीनवर दिसून येतील. याला तुम्ही पाहिजे तसा आकार देऊ शकता. वाटल्यास रिप्लेवर क्लिक करून पुन्हा पाहू शकता. एवढेच नाही तर यामध्ये असलेल्या एका ऑप्शनद्वारे या लाटांचा वेग आपल्या मर्जीनुसार वाढवता आणि कमीदेखील करता येऊ शकतो. यासाठी स्पीड-अप किंवा स्पीड-डाऊन ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

www.speedtest.net  इंटरनेट वापरकर्त्यांसाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने जेवढय़ा स्पीडसाठी तुम्ही पैसे मोजत आहात तेवढी स्पीड तुम्हाला मिळत आहे का? हे तुम्हाला तपासता येईल. या संकेतस्थळाच्या सेवा मोफत आहेत. तसेच जगातील विविध भागातही तुम्हाला या सेवांना लाभ मिळेल. ही सेवा वेब, आयफोन आणि अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे हे संकेतस्थळ इंटरनेट स्पीडवर नजर ठेवण्यासाठी एक उत्तम शस्त्र आहे. प्रत्येक महिन्याला जगातील सुमारे पाच कोटी लोक संकेतस्थळाच्या सेवेचा लाभ घेतात. अशा प्रकारे इंटरनेट कनेक्शन टेस्टिंगच्या बाबतीत ही जगातील अग्रगण्य सेवा आहे. संकेतस्थळावर स्पीड तपासणे खूप सोपे आहे, परंतु जर तुम्ही तुमचा लॉग-इन तयार केला तर तुम्हाला एक टोपण नाव मिळेल. याद्वारे तुम्हाला या संकेतस्थळावर ओळखले जाईल. येथे तुम्ही आपले परिणाम दुसर्‍यांसोबतही शेअर करू शकता.


मम्मी-पप्पाच्या कडेवरील आपल्या लहानपणची छायाचित्रे असो किंवा मम्मी-पप्पाच्या लग्नाची असो, ही सर्व छायाचित्रे आपल्या सर्वांसाठी आठवणींचा खजिना असतो. जुन्या काही छायाचित्रांमध्ये वडिलांचे केस लांब असतात, तर काहींमध्ये 70 च्या दशकातील प्रिंटिंग शर्ट घातलेला असतो. अशा अनेक आठवणी छायाचित्रांद्वारे साठवून ठेवता येतात. मात्र, आपण जेव्हा ती अल्बममध्ये ठेवतो तेव्हा काही वर्षांनंतर ती खराब होतात आणि त्यांचा रंगही फिका पडतो. या सर्व आठवणी संग्रहित करण्यासाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा सोनेरी भूतकाळ दुसर्‍यांना शेअरही करू शकता. संकेतस्थळावर वाढदिवस, पदवी, लग्न, कुटुंब, आजी-आजोबा, सुट्या यासारख्या श्रेणी उपलब्ध आहेत.

www.invoiceto.me: वस्तू किंवा सेवांचे योग्य आणि नीटनेटके बिल तयार करणे प्रत्येकाला जमेल असे नाही. आकडेवारीची आवड नसणार्‍या व्यक्तींना बिल तयार करणे डोकेदुखी ठरते, अशावेळी इन्वाइस्टो डॉट मी ही साइट उपयुक्त ठरते. ही साइट किचकट कामाला सुलभ बनवते. साइटवर एक डमी बिल असते. तुम्ही यात स्वत:चे नाव टाइप करून ग्राहकाचे नाव लिहावे. त्यात ग्राहकाची सविस्तर माहिती आणि विक्री झालेल्या वस्तू, त्याचे प्रमाण आणि दर द्यावा लागतो. एवढे भरल्यावर सर्व आकडेवारीची कॅल्क्युलेशन होते. यात करासंबंधित रकान्यातील आकडेवारीदेखील भरू शकता. फायनल एडिट झाल्यावर गेट पीडीएफवर क्लिक करून प्रिंट घेऊ शकता. तसेच फाइल सरळ ग्राहकाला पाठवू शकता.


www.tabzon.com:  तुम्ही एखाद्या मोठय़ा टीमसोबत काम करत असाल तर प्रत्येक सदस्याची माहिती ठेवणे अवघड असते. अनेकवेळा कोणता सहकारी कामावर आहे की नाही. ऑफिसमध्ये उपलब्ध आहे की नाही. कोण मीटिंगमध्ये व्यस्त आहे. कोण बाहेर फिरत आहे. याची माहिती ठेवणे अवघड होते. अशास्थितीत टॅबजोन वेबसाइट मदतीची ठरते. या साइटवर साइन केल्यानंतर एक ईमेल पाठवून तुम्ही सहकार्‍यांना यात सामील करून घेऊ शकता. यानंतर तुम्हाला फक्त स्टेटस अपडेट करावे लागते. कोण काय करत आहे याची सविस्तर माहिती मिळते. येथे आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. जेथे तुम्ही आपल्या स्थितीविषयी अपडेट करण्यासोबत इतरांनासुद्धा हा पर्याय उपलब्ध करून देऊ शकता. यानंतर वेबसाइटच्या खालच्या बाजूला तीन रंगाचे आयकॉन असतात. ज्यावर क्लिक करुन कोणताही संदेश जोडता येतो. एका मोठय़ा टीमचे व्यवस्थापन करण्यासाठी या साइटची मोठी मदत होते.


www.dropevent.com:  एखाद्या लग्नात किंवा कार्यक्रमात अनेक जण फोटो काढत असतात. प्रत्येकाचे फोटो हे आपआपल्या अल्बममध्ये किंवा अकाउंटवर अपलोड केले जातात, पण सर्वांचे फोटो एकत्र पाहता येत नाही. कार्यक्रमातील सर्व फोटो एकत्र पाहायचे असल्यास डॉपइवेंट ही वेबसाइट उपयुक्त ठरते.या वेबसाइटवर तुम्ही स्वत:ची फोटो गॅलरी तयार करू शकता. या गॅलरीत कोणतेही साइन केल्याशिवाय फोटो टाकता येतात.
सहा महिन्यांसाठी मोफतपणे ही साइट वापरता येते. अकाउंट उघडणारा व्यक्ती आपल्या गॅलरीत कोण कोण फोटो टाकू शकतो हे ठरवतो. त्याने ठरवलेल्या व्यक्तींशिवाय इतर कोणीही फोटो टाकू शकत नाही. साइटची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे याठिकाणी तुम्ही कितीही फोटो अपलोड करू शकता.त्यासाठी कोणतीही र्मयादा नाही.साइट वापरणारे लोक येथील फोटो मोठय़ा साइजमध्ये डाउनलोड करू शकतात.


www.amazingspace.stsci.edu ब्रम्‍हांडाची आवड असणार्‍या अंतराळप्रेमींसाठी ही एक उत्तम अशी वेबसाइट आहे. अमेजिग स्पेस डॉट एसटीएससीआई डॉट ईडीयूवर ब्लॅकहोल्स, सोलर सिस्टिमसोबत इतरही अनेक गोष्टींची माहिती मिळते. हबल स्पेस टेलिकोस्प केंद्रातील टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट संस्थेचा पब्लिक रिलेशन विभागाकडून ही साइट चालवली जाते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ आणि विज्ञानाविषयी रुची वाढवणे हा साइट मुख्य उद्देश आहे. असे असले तरी सर्व वयोगटातील व्यक्तींना आवडेल अशी माहिती या साइटवर उपलब्ध आहे. शालेय स्तरावर उपयोगी होईल अशी माहिती ऑडिओ,व्हिडिओ फॉर्मेटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. हबल अंतराळ दुर्बिणीने शोधलेले रहस्यमय संशोधन या साइटवर पाहण्यास मिळतात

www.kayak.co.in : ऑनलाइन ट्रॅव्हलला चांगले करणे या उद्देशाने ही साइट तयार करण्यात आली आहे. एक्सपीडिया,ट्रॅव्हलसिटी आणि ऑर्विट्जच्या संस्थापकांनी 2004 मध्ये कायकची सुरुवात केली. येथे तुम्ही शेकडो ट्रॅव्हल साइटची तुलना करू शकता. एअरलाइन, हॉटेलचे बुकिंग करण्यासाठी साइटवर तासन्तास बसावे लागते. पण कमी वेळात उत्तम ट्रॅव्हल प्लॅन तयार करण्यासाठी ही साइट चांगला पर्याय आहे.एअरलाइन, हॉटेल, कार आणि ऑनलाइन ट्रॅव्हल साइट सगळे एकाच ठिकाणी उपलब्ध होते. आपल्याला काय हवे हे एकदा निश्चित झाल्यावर या साइटच्या मदतीने त्या सर्व गोष्टींची माहिती घेता येते. एखादी गोष्ट हवी असल्यास आपल्याला ही वेबसाइट संबंधित साइटवर घेऊन जाते. देश-परदेशात पर्यटनाची तयारी करत असाल तर या साइटवर एकवेळ निश्चित भेट द्यावी.

www.luckstock.com: लकस्टॉक डॉट कॉम वेबसाइटवर यूट्यूब, जाहिरात, टीव्ही, ब्रॉडकॉस्टिंग आणि व्यावसायिक कार्यक्रमासाठी रॉयल्टी फ्री संगीत आणि ऑडियो सुविधा मिळते. या वेबसाइटच्या मदतीने तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक, लोगो साऊंड आणि साऊंड इफ्केट खरेदी सुद्धा करता येतात. जगभरातील संगीतकार आणि खरेदीदारांना कल्पनात्मक कलाकृती तयार करण्यासाठी लागणार्‍या संगीत आणि इतर साहित्याची बाजारपेठ निर्माण करणे हा या साइटचा उद्देश आहे. येथे खरेदीदाराला रॉयल्टी फ्री संगीत आणि संगीताची मोठी श्रेणी उपलब्ध आहे. ज्याचा वापर टीव्ही, रेडिओ, ऑनलाइन व्हिडिओ, वेबसाइट प्रेझेंटेशन, प्रोमोसाठी करता येतो. लकस्टॉक डॉटकॉमवर एकदा पैसे भरुन तुम्ही कायम येथील संगीताचा वापर करू शकता. संगीतकारांसाठी सुद्धा हे एक चांगले व्यासपीठ आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वत:चे संगीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकू शकता.

www.onlineconversion.com: दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक गणिती आकडेवारी करावी लागते. डॉलरचे रुपयांमध्ये रुपांतर, तापमानाचे फॅरेनहाइटमधून सेल्सियस, किंवा सेल्सियस ते फॅरेनहाइट असा बदल, किलोमीटरचे मीटर, फुटात मोजमाप करावे लागतात. अशा गणिती क्रिया करण्यासाठी बरेच डोके चालवावे लागते. अशावेळी ऑनलाइन कन्‍वहर्शन ही वेबसाइट उपयुक्त सिद्ध होते. या साइटवर अंतर, ऊर्जा, चलन, नकाशे, दाब, वेग, तापमान, वजन अशा विविध प्रकारामधील कन्‍वहर्शन या साइटवर करता येतात. जगात प्रचलित असलेल्या सर्व मोजमापात एखाद्या प्रमाणाचे रुपांतर करण्याची सोय याठिकाणी आहे. ही साइट वापरण्यास सोपी आणि अतिशय सहज आहे. झटपट आकडेवारी करावयाची असल्यास ही वेबसाइट चांगला पर्याय ठरते. याठिकाणी दिलेल्या विंडोमध्ये संबंधित संख्या टाकून ती हव्या त्या प्रकारात रुपांतरित करता येते.


www.wix.com: सध्याचा जमाना वेब आणि मोबाइलचा आहे. अशावेळी स्वत:ची किवा आपल्या कामाची वेबसाइट असणे काळाची गरज आहे. मोफत वेबसाइट तयार करण्यासाठी विक्स डॉटकॉम ही साइट चांगला पर्याय ठरते. या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या वेबसाइट इंटरफेस पाहावयास मिळतात. ड्रॅग आणि ड्राप क्रियांच्या मदतीने विविध रचना तयार करता येतील. एचटीएमएल 5 आणि फ्लॅशच्या मदतीने ही साइट तयार करता येते. येथे तुम्ही जास्तीत जास्त बेवसाइट तयार करू शकता. साइट तयार करणे एकदम सोपे आहे. पूर्णपणे मोफत आणि आकर्षक डिझाइन उपलब्ध होत असल्याने हा पर्याय आपण वापरून पाहू शकतो. साइट तयार करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा साइन अप व्हावे लागते.त्यानंतर वेगवेगळे टप्पे पूर्ण करून साइट तयार करता येते.

www.amazingspace.stsci.edu: ब्रम्‍हांडाची आवड असणार्‍या अंतराळप्रेमींसाठी ही एक उत्तम अशी वेबसाइट आहे. अमेजिग स्पेस डॉट एसटीएससीआई डॉट ईडीयूवर ब्लॅकहोल्स, सोलर सिस्टिमसोबत इतरही अनेक गोष्टींची माहिती मिळते. हबल स्पेस टेलिकोस्प केंद्रातील टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट संस्थेचा पब्लिक रिलेशन विभागाकडून ही साइट चालवली जाते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ आणि विज्ञानाविषयी रुची वाढवणे हा साइट मुख्य उद्देश आहे. असे असले तरी सर् वयोगटातील व्यक्तींना आवडेल अशी माहिती या साइटवर उपलब्ध आहे. शालेय स्तरावर उपयोगी होईल अशी माहिती ऑडिओ,व्हिडिओ फॉर्मेटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. हबल अंतराळ दुर्बिणीने शोधलेले रहस्यमय संशोधन या साइटवर पाहण्यास मिळतात.


www.autojunction.in: वाहनांसाठी लागणारे स्पेअरपार्ट आणि वस्तू ऑनलाइन खरेदी करण्यासाठी ऑटोजक्शन ही साइट एक उत्तम पर्याय आहे. या साइटवर तुम्हाला विविध वस्तूच्या माहितीसोबत नव्या गाड्यांचे रिव्हिव,फिचर,विमा आणि कर्जाविषयी माहिती उपलब्ध होते. विविध पार्टची किमतीसह माहिती याठिकाणी उपलब्ध आहे. वाहन खरेदी करण्यापूर्वी आवश्यक असणारी माहिती देखील या साइटवर उपलब्ध आहे. कारला आकर्षक बनवण्यासाठी याठिकाणी विविध प्रकारचे स्पेअरपार्ट उपलब्ध आहेत

www.blogger.com: लोकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून ब्लॉगर डॉटकॉम ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. ब्लॉगरच्या मदतीने विविध विषय,घडामोडी,वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी,सामाजिक,राजकीय किंवा आर्थिक अशा कोणत्याही विषयावर तुम्ही स्वत:ची मते मांडू शकता. येथे तुम्हाला स्वत:च्या अकाउंटसाठी वेगळे नाव द्यावे लागते. लोकांना अगदी सहजतेने ब्लॉगिंग करता येते हे या साइटचे वैशिष्ट्ये आहे.ब्लॉगर टेप्लेट डिझाइनच्या मदतीने आपल्याला हवे तसे रूप देता येते.येथे एचटीएमएल आणि सीएसएस देखील एडिट करता येते


www.uwall.tv: तुम्हाला यूट्यूबवर अपलोड केलेल्या म्युझिक व्हिडिओपैकी आवडीचे व्हिडिओ पाहावयाचे असतील आणि त्यासाठी तुमच्याकडे फारसा वेळ नसेल तर यूवॉल डॉट टीवी ही वेबसाइट कामाची ठरते. या साईटच्या मदतीने तुम्ही आवडता व्हिडिओ निवडताना लागणारा वेळ वाचवू शकता. या साइटवर एका क्लिकच्या मदतीने प्लेलिस्ट तयार करण्याची संधी मिळते. वेबसाइटच्या पेजवर विविध गायकांचे फोटो आहेत. त्यावर क्लिक केल्यानंतर संबंधित गायकाची विविध गाणी दिसतात. गायकाच्या गाण्याच्या यादीतून तुम्ही आवडती गाणी स्वत:च्या प्लेलिस्टमध्ये जोडू शकता. त्याचप्रमाणे आवडत्या गाण्याची काही अक्षरे टाईप करुन तुम्ही गाणी शोधू शकतात.या साइटच्या मदतीने तुम्ही कमी वेळात विविध गाणी गोळा करु शकतात.
www.apartmenttherapy.com घर सजवण्याची आवड असणार्‍यांसाठी या साइटवर उपयुक्त माहिती मिळते. ही साइट तुम्हाला विविध रिसोर्सेज,कल्पना आणि संबंधित लोकांशी कनेक्ट करते. या साइटवर घर आकर्षक, नीटनेटके आणि स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक पर्याय मिळतात. एक शांत, स्वच्छ आणि सुंदर घर आनंद आणि भरभराटी आणते असे ही साइट तयार करणार्‍यांचे मत आहे. घराचे रूप बदलण्यासाठी जास्त पैशांची नाही तर कल्पकता,उत्साह आणि प्रेरणेची गरज असते. तुम्ही या वेबसाइटच्या मदतीने घर सजावटीची प्राथमिक माहिती घेऊ शकता.शहरातील वाढत्या अपार्टमेंट संस्कृतीमुळे ही वेबसाइट दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे. घर सुंदर आणि नीटनेटके असल्यास दिवसाची सुरुवात चांगली होते.तसेच आकर्षक घरामुळे समाजात एक विशिष्ट वलय प्राप्त होते.ज्यांच्या घराची कामे सुरू आहेत त्यांनी एकवेळ आवर्जून या साइटला भेट दिली पाहिजे.

www.legacylocker.com:  जगातील प्रत्येक व्यक्तीला एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. मृत्युपूर्वी अनेकजण आपल्या संपत्तीसाठी मृत्युपत्र लिहून ठेवतात आणि एखाद्याला वारस ठरवतात. स्थावर संपत्तीप्रमाणे व्‍हर्चुअल जगाचा देखील वारस निवडता येतो. तुमच्या माघारी हा व्यक्ती तुमचे जी मेल अकाउंट,फेसबुक अक्सेस करू शकतो. याच्यासाठी लेगसीलॉकर ही वेबसाइट एक चांगला पर्याय आहे. या साइटवर लॉगइन केल्याबरोबर तुम्ही दोन किंवा जास्त व्यक्तींचे नॉमिनेशन करू शकता. तुमच्या मृत्यूनंतर त्याची पडताळणी होऊन त्यांना अकाउंट वापरण्याचे अधिकार मिळतील. यापैकी एकाकडे तुमच्या अकाउंटची सविस्तर माहिती घेण्याचा अधिकार असेल. लेगसीलॉकर डॉटकॉमच्या सशुल्क सेवेच्या मदतीने तुम्ही अनेक अकाउंट, लेटर्स आणि इतर माहिती जोडू शकता.


www.pixiq.com:  या संकेतस्थळामध्ये फोटोग्राफीशी संबंधित 50 प्रमुख संकेतस्थळांच्या हायपर लिंक दिल्या आहेत. आवडत्या संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला त्या संकेतस्थळावरील छायाचित्रे, व्हिडियोज पाहता येतील. यामध्ये असलेल्या काही लिंक्सच्या माध्यमातून तुम्हाला फोटोग्राफीशी संबंधित इत्थंभूत माहिती जाणून घेता येईल. संकेतस्थळात गाइड टू फिल्म फोटोग्राफीची लिंकही आहे. यामध्ये आउटडोअर फोटोग्राफी, पिक्चर करेक्ट आणि फोटोग्राफीचे अनेक प्रकार शिकण्यास मदत करू शकणार्‍या अनेक लिंक्स आहेत. या संकेतस्थळावर फोटोग्राफी न्यूजसाठीही वेबसाइट्स आहेत. येथे फोटोग्राफीच्या क्षेत्रात होणार्‍या अपडेट्सची माहिती मिळते.
www.wanderinearl.com: डेरेक अर्ल बॅरोनला लोक वंडरिंग अर्ल नावाने ओळखतात. जगभरातील अनेक ठिकाणांची यात्रा करून एक भटकंतीप्रेमी म्हणून स्वत:ची ओळख तयार केली आहे. 1999 मध्ये थायलंड येथून अर्लच्या पहिल्या प्रवासाची सुरुवात झाली. प्रवासात त्यांना आनंद वाटल्याने त्यांनी सुट्या वाढवून घेतल्या आणि सुरू झाला एक अनोखा प्रवास. गेल्या 13 वर्षांत अर्ल यांनी जवळपास 70 देशांचा प्रवास केला आहे. या प्रवासाच्या काळात त्यांनी टूर मॅनेजरचे काम केले. मेडिटेशनचे काम केले. त्याचप्रमाणे गिर्यारोहणापासून ते चित्रपटात अभिनय करण्याचा आनंद घेतला. एकदा तर त्यांचे दोन दिवसासाठी अपहरण झाले होते. या प्रवासात आणि पर्यटनात त्यांना आलेले अनुभव ब्लॉगवर टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्ल याचे अविस्मरणीय अनुभव वांडरिंग अर्ल डॉट कॉमवर उपलब्ध आहेत. प्रवास वर्णन वाचण्याची आवड असणार्‍यांसाठी ही वेबसाइट अनोखी मेजवानी ठरेल.

www.sourceforge.netसंगणक आणि इंटरनेटवर काम करणार्‍या व्यक्तींसाठी ही एक उपयुक्त साइट आहे. या साइटवर नियमित वापरले जाणारे अनेक सॉफ्टवेअर मोफतपणे उपलब्ध आहेत. या साइटच्या मदतीने तुम्ही फक्त सॉफ्टवेअर घेऊ शकत नाहीत, तर ओपन सोर्स साइटच्या माध्यमातून सॉफ्टवेअरमध्ये योग्य ते बदल करुन नव्या गोष्टी जोडून अधिक उपयोगी सॉफ्टवेअर बनवू शकता. बदल केलेले सॉफ्टवेअर नव्याने प्रसारित करू शकता. या साइटच्या स्टोअरमध्ये कामाशी निगडित हजारो सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. कामाचे किंवा आवडीचे सॉफ्टेअवर शोधण्यासाठी फक्त त्याचे नाव टाइप करावे लागते. साइटवरील सर्च विडोंज उपलब्ध साठय़ामधील अनेक सॉफ्टवेअरचे पर्याय तुमच्यासमोर ठेवतो. त्यातील योग्य तो सॉफ्टवेअर डाउनलोड करुन घ्यावा. बाजारात मोठी रक्कम मोजावी लागणारी अनेक सॉफ्टवेअर सुद्धा याठिकाणी मोफत उपलब्ध आहेत.
 
www.goodnightsleepsite.com-  नवीनच पालक झालेल्या पती-पत्नींना सर्वात महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे तान्हुले बाळ रात्री अपरात्री जागे राहण्याची. ऑफिसला जाताना किंवा कामाच्या वेळी बाळ नेमके झोपलेले असते, पण रात्री बाळ जागे राहते. जर आणखी एक अपत्य असल्यास ही समस्या तीव्र होते. अशा पालकांसाठी गुडनाइटसिल्पसाइट हे संकेतस्थळ अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या साइटच्या मदतीने तुम्हाला बाळाच्या झोपण्याचा पॅटर्न कळू शकतो. बाळासाठी किती झोप आवश्यक आहे. त्या वेळी कोणती काळजी घ्यावी याची माहिती येथे मिळते. बाळासाठी निश्चित असा कोणताही पॅटर्न तयार करता येत नाही. प्रत्येक बाळाची झोपण्याची पद्धती, वेळवेगवेगळी असते. साइट फक्त बाळाच्या झोपण्याच्या वेळेच्या मदतीने एक आराखडा तयार करते. ज्याच्या मदतीने बाळाला पुरेशी झोप आणि पालकांचा त्रास कमी होईल. याच्या मदतीने बाळाच्या जागे राहण्याचा कालावधी तुम्हाला आधीच कळेल. या साइटवर प्रायव्हेट कंन्स्लटेशन्स, वर्कशॉप अँड इव्हेंटस, क्लाइंट स्टोरीज असे सेगमेंट आहे.

www.imdb.com: चित्रपट, दूरचित्रवाणीवरील सेलेब्रिटीच्या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्या आयएमडीबी डॉट कॉम हे साइट चांगला पर्याय आहे. चित्रपट,टीव्ही आणि सेलेब्रिटीच्या माहितीसाठी जगातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वसनीय साइट मानले जाते. या साइटवर 10 कोटींपेक्षा जास्त आकडेवारी आहे. यात 20 लाखांहून जास्त चित्रपट,टीव्ही कार्यक्रम आणि कलाकाराची माहिती आहे. आयएमबीडीची सुरुवात 1990च्या सुमारास टीव्ही आणि चित्रपटाच्या शौकीन असलेल्या आंतरराष्ट्रीय समूहाने केली. आज ही साइट मोबाइल आणि सोशल नेटवर्किंगवर उपलब्ध आहे. येथे आपल्याला चित्रपट, टीव्ही कार्यक्रमाशी निगडित परीक्षण,ट्रेलर,व्हिडिओ आणि आर्टिकल मिळतात. कलाकार, तंत्रज्ञ यांची वैयक्तिक माहिती सुद्धा याठिकाणी उपलब्ध आहे. चित्रपटाचे वेड असणार्‍या रसिकांसाठी ही वेबसाइट एक पर्वणी आहे.


www.flightradar24.com हे संकेतस्थळ पाहून तुम्ही नक्कीच आश्यर्यचकित व्हाल. तंत्रज्ञान काय काय करू शकते, हे या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येईल. फ्लाइट रडार एक ग्लोबल मॅप असून तो हवेत उडणार्‍या सर्व विमानांना ट्रॅक करतो. या मॅपच्या माध्यमातून एखादे व्यावसायिक विमान सध्या कोणत्या लोकेशनवर उडत आहे, याचा शोध तुम्हाला कधीही घेता येऊ शकेल. तसेच तुमची फ्लाइट वेळेवर उडणार की लेट आहे, हेदेखील तुम्हाला जाणून घेता येईल. यासाठी संकेतस्थळ एडीएस-बी (ऑटोमॅटिक डिपेंडंट सर्व्हिलंस-ब्रॉकास्टर) चा वापर करते. हे तंत्रज्ञान जवळपास 60 टक्के प्रवासी विमानांमध्ये लावण्यात आलेले असते. या संकेतस्थळाचा डाटा अमेरिका आणि यूरोपमध्ये जास्त अचूक असतो. तथापि, भारतातही याचे चांगले परिणाम मिळतात. संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला तातडीने एखादी फ्लाइट आणि विमानतळ सर्च करता येईल. याशिवाय तुम्ही प्लेन मेन्यूमध्ये जाऊन कॉलसाइन, फ्लाइट नंबरच्या माध्यमातूनही सर्च करू शकता.


www.pictorymag.com:  एका छायाचित्रात हजारो शब्दांचे सार्मथ्य असते, असे म्हणतात; परंतु अनेकवेळा फोटोसोबत कॅप्शन दिल्यास त्या फोटो संबंधित जास्त माहिती मिळते. प्रिक्टोरियामॅग ही क्राउड सोर्सिंगवर चालणारी वेबसाइट असून लॉरा ब्रुनोव या ही साइट चालवतात. या साइटवर महिला आणि पुरुषांशी संबंधित रंजक गोष्टी उपलब्ध आहेत. पिक्टोरीमध्ये प्रत्येक विषयावरील एडिटोरियल थीमवर आपल्याला कॅप्शनसोबत फोटो पोस्ट करायचा असतो. या फोटोपैकी एकाची निवड होऊन ती साइटवर दाखवली जाते.अशाप्रकारे विविध फोटो आणि कॅप्शनचे सुंदर कलेक्शन तयार होते.याठिकाणी तुम्हाला कॅप्शन फक्त इंग्रजीमध्ये लिहावे लागतात.फोटोग्राफीचा छंद असणार्‍यांसाठी ही एक चांगली साइट आहे. फक्त ही साइट नियमित अपडेट होत नाही हीच मोठी अडचण आहे.
www.mobile9.comही साइट मोबाइल आणि टॅब्लेट वापरणार्‍यांसाठी अत्यंत उपयोगाची आहे.या साइटच्या मदतीने आपल्या डिव्हाइसला लागणारे अनेक अँप डाउनलोड करता येतात. या वेबसाइटचा इंटरफेस आकर्षक आणि वापरण्यास सोपा आहे.‘एंटर डिव्हाइस नेम’च्या विंडोमध्ये फक्त आपल्याला हव्या असलेल्या वस्तूचे नाव टाकावे लागते.याच्या मदतीने थीम,रिंगटोन,वॉलपेपर,अँप,गूगल प्ले, व्हिडिओ अशी सामग्री डाउनलोड करता येते.आपल्याला हवे असलेले अँप किंवा इतर गोष्टी या ठिकाणी नसल्यास फक्त ई-मेल पाठवून त्या घेता येतात. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या मोबाइलला लागणारे सर्व अँप या साइटवर उपलब्ध आहेत.त्याचप्रमाणे विविध प्रकारात हे उपलब्ध असल्यामुळे आपल्या गरजेनुसार त्यांची निवड करणे सोपे जाते.


www.scoopinion.com-  इंटरनेटवर मोठय़ा प्रमाणात वाचनीय साहित्य उपलब्ध आहे, पण अनेक वेळा आवडीचे साहित्य शोधताना अडचणी येतात. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ,विश्लेषक आपले लेख, अहवाल इंटरनेटवर टाकत असतात, पण त्याची माहिती नसल्याने अनेक वेळा हे लेख वाचले जात नाहीत. या समस्येवर तोडगा काढणारी ही साइट आहे. ही साइट एका स्मार्ट इंजिनप्रमाणे काम करते. तुमच्या वाचन पॅटर्नला ही साइट ट्रॅक करत त्याप्रमाणे साहित्य पुरवते. तुम्ही फेसबुक, गुगल क्रोम किंवा फायरफॉक्सच्या साहाय्याने ही साइट वापरू शकता. दुसर्‍यांनी वाचलेले आणि पसंद केलेले साहित्य याठिकाणी उपलब्ध होते. त्याचप्रमाणे ही साइट गुणवत्तेला प्राधान्य देते. याच्या मदतीने तुम्हाला चार आर्टिकलचे पर्याय उपलब्ध होतात.

www.touristlink.com : देशविदेशात पर्यटन करण्याची आवड असणार्‍यांसाठी ही वेबसाइट एक चांगला पर्याय आहे. ही वेबसाइट सोशल प्लॅटफॉर्मवर काम करत असल्याने याच्या मदतीने सहकारी पर्यटकासोबत माहिती शेअर करता येते.तसेच याच्या मदतीने एक ग्रुप तयार करून पर्यटनाचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही एखाद्या नव्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणार असाल तर ही वेबसाइट तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरते. या संकेतस्थळावर जगातील वेगवेगळ्या भागात फिरलेल्या लोकांसोबत ओळख होऊ शकते.त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी,खाद्यसंस्कृती ,प्रेक्षणीय स्थळे,नाइट लाइफ,विविध कार्यक्रम यांची माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे इच्छित ठिकाणची हॉटेल बुकिंग सुद्धा करू शकता. ही वेबसाइट वापरणार्‍यामध्ये भारतीयांची संख्या सर्वात जास्त आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने भारतीय व्यक्तींकडून सर्वात जास्त पाहिले जाणार्‍या पर्यटन स्थळांची माहिती सुद्धा मिळते.
www.resumonk.com: तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीसाठी बायोडाटा पाठवणार असाल तर ही वेबसाइट फायदेशीर ठरू शकते. या वेबसाइटच्या मदतीने तुम्ही स्वत:चा बायोडाटा आकर्षक पद्धतीने तयार करू शकता. बायाडोटा तयार करण्याची पद्धत सोपी आहे.सुरुवातीला वैयक्तिक माहिती विचारली जाते.त्यानंतर शिक्षण,अनुभव,कौशल्य, प्रोजेक्ट आदी माहिती जमा केल्यानंतर सर्व माहिती सेव्ह करा. पाच प्रकारचे टेम्पलेट याठिकाणी उपलब्ध असून तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेम्पलेट निवडू शकता. एका टेम्पलेटची निवड केल्यानंतर आकर्षक बायोडाटा तयार होतो.


www.dailywritingtips.com: विद्यार्थी,ब्लॉगर,पत्रकार,कॉपी रायटर किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणार्‍या आणि लिहिण्याची आवड असणार्‍यांसाठी उपयुक्त ठरेल अशी ही वेबसाइट आहे. या वेबसाइटवर जवळपास दीड हजार लेख उपलब्ध आहेत. यातील बहुतांश लेख हे प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेले आहेत.
वेगवेगळ्या 25 प्रकारात लेख उपलब्ध आहेत. लिहिण्याची आवड असणार्‍यांसाठी ही वेबसाइट मार्गदर्शक ठरेल अशी आहे. त्याचप्रमाणे आपले संवाद कौशल्य सुधारण्यासाठी ही वेबसाइट मदत करते. त्याचप्रमाणे पत्र, निवेदन किंवा तत्सम लेखन कसे करावे याची माहिती सुद्धा दिलेली आहे. पत्राच्या खाली कधी युवर फेथफुली लिहावे आणि कधी युवर सिनसियरली लिहावे अशा गोष्टी सुद्धा या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.


www.skinytast: विविध व्यंजनाचा आस्वाद घेणार्‍या खवय्यांसाठी ही वेबसाइट एक मेजवानी ठरेल. या वेबसाइटवर स्वादिष्ट आणि आरोग्यदृष्टीने हितकारी पदार्थांची रेसेपी उपलब्ध आहे. यावर दाखवण्यात आलेल्या रेसेपीमध्ये फॅटचे प्रमाण नियंत्रणात असते.जीना होमोल्का या ही वेबसाइट चालवतात. त्या प्रसिद्ध रेसेपी डेव्हलपर आणि फोटोग्राफर आहेत.घरच्या जेवणाप्रमाणे चव असलेल्या शेकडो रेसेपी या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येक डिशमध्ये असणारी पौष्टिक तत्त्वे यात दाखवलेली असतात. नियमित नवनवी रेसेपी टाकून वेबसाइट अपडेट केली जाते. आपल्या आवडत्या रेसेपीला तुम्ही फेव्हरेट बॉक्समध्ये सेव्ह करू शकता. वेगवेगळ्या देशांमधील रुचकर पदार्थांची चव चाखायची इच्छा असल्यास एकवेळ अवश्य ही वेबसाइट पाहावी.


www.howjsay.com :  अनेकवेळा इंग्रजी शब्दाचे योग्य उच्चारण करण्याची समस्या निर्माण होते. तुम्हाला सुद्धा इंग्रजी उच्चाराची समस्या जाणवत असल्यास ही वेबसाइट फायद्याची ठरते. वेबसाइट वापरण्यास सोपी असून आपल्या हवा असलेल्या शब्द फक्त वेबसाइटवर टाइप करावा लागतो. शब्द टाइप करून सबमिट केल्यावर त्या शब्दाशी मिळते जुळते शब्द आणि त्याचे योग्य उच्चारण उपलब्ध होतात. जो शब्द तुम्ही टाइप केला असेल त्याचे उच्चारण गुलाबी रंगात दिसते. त्यावर क्लिक केल्यानंतर त्याचे योग्य उच्चारण तुम्हाला ऐकू येईल.
या संकेतस्थळाच्या डिक्शनरीमध्ये तब्बल दोन लाख शब्द आहेत. ज्या शब्दांचे स्पेलिंग माहिती नसेल असे शब्ददेखील आपल्याला शोधता येतात.

www.wherecoolthingshappen.com:  धकाधकीच्या कामामुळे जर तुमचा तणाव वाढलेला असेल तर तुमच्या मेंदूला कुल करण्यासाठी काही गोष्टींची गरज भासते. अशावेळी व्हेअर कुल थिंग हॅपन ही वेबसाइट एक पर्वणी ठरेल. या साइटवर अशा गोष्टींचा खजिना आहे जो डोक्याला कुल करेल. कला,प्रवास,निसर्ग,अनोखे फोटो,विविध गॅझेट अशा अनेक गोष्टी याठिकाणी उपलब्ध आहेत. वेबसाइटवरील पोस्ट वाचून सुद्धा तुम्हाला मनशांती मिळू शकेल.या साइटवरचे फोटो सुद्धा तुम्हाला वापरता येतील फक्त त्यांच्या लिंकची माहिती घ्यावी लागेल.याचा इंटरफेस आकर्षक असून वापरण्यास एकदम सोपी अशी ही वेबसाइट आहे.

adviceadda.com: फुकटचा सल्ला देणारे अनेक जण भेटतात, पण हा सल्ला कितपत लागू पडेल हे सांगता येणार नाही. असे असले तरी एक संकेतस्थळ असेदेखील आहे जे तुम्हाला एक्सपर्ट लोकांचा चांगला सल्ला उपलब्ध करून देते. हा सल्ला पूर्णपणे मोफत आहे हे विशेष. तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी हा एक देशी अड्डा आहे. शिक्षण, करिअर, जॉब रिलेशनशिप, तणाव, आरोग्य,फिटनेस, लाइफस्टाइलसारख्या विषयांवर सल्ला मिळतो. अँडव्हाइस अड्डा डॉट कॉमवर नेटिजन्सना कोणत्याही विषयाची माहिती आणि सल्ला मिळू शकतो. हा भारताचा पहिला ऑनलाइन अँडव्हाइस पोर्टल आहे. ज्यावर तज्ज्ञ आणि विषयांचे जाणकार लोकांची टीम उपलब्ध आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सल्ला देतात. आपल्यालासुद्धा एखादा सल्ला हवा असल्यास या वेबसाइटचा पर्याय वापरण्यास हरकत नाही.

thekidshouldseethis.com: इंटरनेट हे अनेक गोष्टींचा सागर आहे. येथे चांगल्या गोष्टीप्रमाणे वाईट गोष्टींची सुद्धा भरमार आहे. चांगले काय,वाईट काय याची जाण प्रौढ व्यक्तींना असते पण मुलांसाठी काही बाबी धोकादायक असतात. अशावेळी मुलांना चांगली माहिती पुरवण्यासाठी हे संकेतस्थळ पालकांसाठी एक पर्वणी आहे. मुलांसाठी तयार केलेली अनेक व्हिडिओ यावर उपलब्ध आहेत. आईवडिलांच्या मदतीने मुलांना ही व्हिडिओ पाहता येतील. मुलांमधील उत्सुकता आणि ज्ञान वाढवण्यासाठी हे फायदेशीर ठरते. इंटरनेटवर हे व्हिडिओ फारसे चर्चित नसतील पण मुलांच्या संगोपनात हे नक्की मदतीचे ठरतील.या ठिकाणी असलेले व्हिडिओ महिला आणि मुले एकत्र पाहू शकतील अशी आहेत. तुमच्या मुलांना घेऊन या संकेतस्थळाला एकदा भेट देणे नक्कीच आनंददायी ठरेल.

Www.mega.co.nz ऑनलाइन काम करणार्‍या व्यक्तीसाठी या फाइल शेअरिंग वेबसाइटसाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे. ड्रॉप बॉक्स आणि गुगल ड्राइव्हसारख्या क्लाउड सेवा देणार्‍या संकेतस्थळाप्रमाणे ही वेबसाइट काम करते. गेल्यावर्षी पायरसीला चालना दिल्याच्या आरोपाखाली वेबसाइटच्या मालकाला अटक केली होती, पण आता नव्या रूपात ही वेबसाइट उपलब्ध आहे. या वेबसाइटवर तुम्ही 50 जीबीपर्यंत डाटा साठवू शकता. त्याचप्रमाणे याची सुरक्षा प्रणाली अद्ययावत आहे. याठिकाणी माहिती अपलोड करताना ती इंक्रिप्ट केली जाते.ज्यामुळे ही माहिती गोपनीय राहते. तसेच डी-इंक्रिप्ट केल्याशिवाय कोणीही ही माहिती अँक्सेस करू शकत नाही. वेबसाइटचा इंटरफेससुद्धा आकर्षक आहे.

Www.signnow.comमाहिती तंत्रज्ञानाच्या या युगात तुम्हाला एखाद्या ठिकाणी डिजिटल सही करण्याची गरज भासल्यास ही वेबसाइट उपयुक्त ठरू शकते. ही वेबसाइट अंड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर चालणार्‍या साधनांवर अँप म्हणून वापरता येते. या वेबसाइटवर एकदा साइन अप करावे लागते. यानंतर त्या जागेची निवड करावी ज्याठिकाणी जॉन हँकॉक ठेवायचे आहे. याच्यानंतर तुम्हाला तीन पर्याय विचारले जातील. पहिल्यात सिग्नेचर टॅम्पलेटप्रमाणे नाव टाइप करावे, माऊसच्या मदतीने स्वाक्षरी रेखाटावी किंवा आपल्या स्वाक्षरीची इमेज अपलोड करायचा पर्याय विचारला जाईल. ही प्रक्रिया सर्वात सोपी आहे. एकापेक्षा जास्त लोकांच्या स्वाक्षरी घ्यायच्या असतील तर इतर लोकांना साइटच्या मदतीने जोडता येते.


www.grabinbox.com या संकेतस्थळाच्या मदतीने तुम्ही फेसबुक,ट्विटर,लिक्डइनवरील स्वत:चे अकाउंट प्रोफाइल आकर्षक आणि सुंदर करू शकता. या संकेतस्थळावर पहिल्यांदा जाताना सोशल नेटर्वकिंगवरून लॉगइन होण्यासाठी सांगितले जाते. यानंतर ग्रेबइन बॉक्स तुमच्या सोशल मीडिया नेटवर्कला अक्सेस करू शकेल. फेसबुक किंवा ट्विटरवर तुमचे फॉलोअर जरी जास्त असले तरी हे संकेतस्थळ योग्य प्रकारे काम करते. हे संकेतस्थळ कोणत्याही त्रयस्थ अँप्लिकेशन प्रमाणे फेसबुक आणि ट्विटरवर केलेले कॉमेंट किंवा पोस्ट काढण्याची सेवा उपलब्ध करून देते. आपल्या अकाउंटवर कोणतेही अपडेट झाल्यास त्याचे नोटीफिकेशन हे संकेतस्थळ तत्काळ देते.


www.freemeditation.comरंजक संकेतस्थळ एखाद्या कारणामुळे तुम्ही तणावात आहात आणि आराम आणि शांतता हवी असते यावेळी मेडिटेशन उपयुक्त ठरते. जर मेडिटेशनच्या एखाद्या क्लासमध्ये सामील होणे शक्य नसल्यास किंवा त्यासाठी वेळ आणि पैशाची समस्या असल्यास ही वेबसाइट चांगला पर्याय आहे. या वेबसाइटवर मेडिटेशनच्या टिप्स मोफत मिळतात. मेडिटेशनसाठी कोणती पद्धती वापरावी. त्याचे फायदे याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध आहे. मेडिटेशन संबंधी लेख, व्हिडिओ उपलब्ध आहे, मेडिटेशनवेळी कोणते संगीत वापरावे याचे मार्गदर्शन वेबसाइटवर आहे.


thekidshouldseethis.com: इंटरनेट हे अनेक गोष्टींचा सागर आहे. येथे चांगल्या गोष्टीप्रमाणे वाईट गोष्टींची सुद्धा भरमार आहे. चांगले काय,वाईट काय याची जाण प्रौढ व्यक्तींना असते पण मुलांसाठी काही बाबी धोकादायक असतात. अशावेळी मुलांना चांगली माहिती पुरवण्यासाठी हे संकेतस्थळ पालकांसाठी एक पर्वणी आहे. मुलांसाठी तयार केलेली अनेक व्हिडिओ यावर उपलब्ध आहेत. आईवडिलांच्या मदतीने मुलांना ही व्हिडिओ पाहता येतील. मुलांमधील उत्सुकता आणि ज्ञान वाढवण्यासाठी हे फायदेशीर ठरते. इंटरनेटवर हे व्हिडिओ फारसे चर्चित नसतील पण मुलांच्या संगोपनात हे नक्की मदतीचे ठरतील.या ठिकाणी असलेले व्हिडिओ महिला आणि मुले एकत्र पाहू शकतील अशी आहेत. तुमच्या मुलांना घेऊन या संकेतस्थळाला एकदा भेट देणे नक्कीच आनंददायी ठरेल.


Www.calm.comएखाद्या तणावपूर्ण कामानंतर रम्य निसर्गमय ठिकाणी जाण्याची इच्छा होते पण कामाच्या व्यापात शक्य होईल यांची शाश्वती नसते. यावेळी ही वेबसाइट फार उपयुक्त ठरते. शहरातील गोंगाटातही बसल्या जागी नयनरम्य परिसराचा आस्वाद घेता येईल. वेबसाइटवर सहा वेगवेगळ्या प्रकारचे सीन (दृश्य) उपलब्ध आहेत. यापैकी एक निवड करून मंद संगीत ऐकत निसर्ग पाहण्याचा आनंद उपभोगता येईल. यातील दृश्यात जंगलातील नदीपासून समुद्र किनार्‍यावरील सूर्यास्तापर्यंत अनेक चांगल्या दृश्यांचा समावेश आहे. तुम्ही आपल्या सोयीनुसार संगणकावर दोन ते 10 मिनिटांपर्यंत टाइमसेट करून निवांतपणाचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही मंद संगीताचा पर्यायही निवडू शकता. त्याचप्रमाणे यातील दृश्याची माहिती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. निसर्गरम्य ठिकाणी नाही जमले तरी व्हर्च्‍युअल जगात जाऊन तुम्ही निवांतपणाचा अनुभव घेऊ शकता.



Www.medindia.netही वेबसाइट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांकडून चालवली जाते. औषधी आणि आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी ही वेबसाइट वापरता येईल. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. याची भाषा एवढी सोपी आहे की वैद्यकीय ज्ञान नसणार्‍या व्यक्तीला सुद्धा ती चांगल्या प्रकारे कळते. येथे मधुमेह,ह्रदयविकार,वजन वाढणे अशा समस्याविषयी माहिती मिळते. येथील एका भागात आहार आणि पोषण तत्त्वाच्या माहितीसोबत विविध रोगांची माहिती देण्यात आली आहे. वेबसाइटवर मल्टिमीडिया, छायाचित्रे, अँनिमेशन आणि व्हिडिओ भरपूर आहेत.


Www.rentacoder.comतुम्ही जर फ्रीलान्सर प्रोग्रामर असाल आणि स्वत:चे काम आऊटसोर्स करणार असाल तर ही वेबसाइट मदतीची ठरू शकते.जगभरातील संगणक प्रोग्रामर तज्ज्ञांना स्वत:चे उत्पादन विकण्यासाठी हा जागतिक फ्री लान्स बाजार आहे. या वेबसाइटच्या मदतीने ग्राफिक्स डिझाइन,लेखन,ट्रांसलेशन आणि इतर माहितीची देवाणघेवाण करता येते. वेबसाइटच्या साहाय्याने संपर्क वाढवून काम करता येते किंवा फ्री लान्स पद्धतीने काम करू शकता.या वेबसाइटवर काम करण्याचे चार टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात येथे रजिस्ट्रेशन करून प्रोजेक्ट पोस्ट करावा लागतो. त्यानंतर प्रोजेक्टवर बोली लागण्याची वाट पाहावी लागते. तिसर्‍या टप्प्यात कामाला चांगला मोबदला मिळाल्यास कंपनीला किंवा व्यक्तीला प्रोजेक्ट देता येतो. अंतिम टप्प्यात काम पूर्ण केले जाते. काम पूर्ण आणि घेणारा व्यक्ती संतुष्ट झाल्यानंतर पैसे मिळतात.


www.netapedia.in: वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी अनेक पीडिया इंटरनेटवर उपलब्ध आहेत. परंतु राजकीय नेत्यांच्या विषयी माहिती असणारे संकेतस्थळाविषयी फारशी माहिती ऐकिवात नाही. नेतापीडिया या संकेतस्थळाच्या मदतीने नेत्यांविषयी अधिक जाणून घेता येईल. या संकेतस्थळावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी सारख्या राजकीय नेत्यांविषयी असणारी माहिती उपयोगी येते.
वेबसाइटच्या मदतीने तुम्ही संबंधित नेत्यांचा मतदारसंघ, तेथे सुरू असलेली कार्य आणि त्यांना मिळालेला निधीजाणून घेऊ शकता. तुम्ही राज्य आणि मतदार संघानुसार नेत्यांची माहिती मिळते. ही वेबसाइट आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी चालवतात.
 
www.worldmeters .com जगभरातील रंजक माहिती आणि आकडेवारी जाणून घेण्‍यासाठी ही वेबसाईट चांगला पर्याय आहे. आपल्‍याला याठिकाणी अपडेट आकडेवारी मिळते. लोकसंख्‍येपासून सरकारी आणि अर्थव्‍यवस्‍थेशी संबंधित आकडेवारी या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. वर्तमान लोकसंख्‍येसोबत यावर्षी जन्‍म आणि मृत्‍यूची माहिती मिळते. अर्थव्‍यवस्‍थेमशी निगडित आकडेवारी देशभरातील संगणकाची विक्री, वाहन, ग्राहकोपयोगी वस्‍तूंच्‍या विक्रीची आकडेवारी उपलब्‍ध आहे. सोसायटी आणि मीडिया विभागात वृत्तपत्राची विक्री, इंटरनेट युजर आणि गुगल सर्च संबं‍धित आकडेवारी, पर्यावरणसंबंधित आकडेवारीमध्‍ये जंगलात होणारी वृक्षतोड, कार्बन प्रदूषण, खनिज संपत्तीची माहिती मिळते. सिगारेटची विक्री, इंधनाचा वापर प्रदर्शित झालेले चित्रपट, मृत्‍यू आणि आत्‍महत्‍या यांचीसुद्धा आकडेवारी याठिकाणी उपलब्‍ध आहे.


https://lastpass.com/ आज प्रत्‍येकाकडे अनेक प्रकारचे पासवर्ड आहेत. -मेल आयडी, फेसबुक आणि ट्विटरसारखे अकाऊंट सामान्‍य बाब झाली आहे. पण यांचे पासवर्ड लक्षात ठेवणे ही सर्वात मोठी समस्‍या आहे. अशावेळी लास्‍टपास ही वेबसाईट तुम्‍हाला मदतीची ठरते. पासवर्ड लक्षात ठेवणे आणि वापरावेळी आठवण्‍यासाठी जेवढा वेळ खर्च होतो. त्‍यापेक्षा ही वेबसाईट वापरणे चांगला पर्याय ठरू शकतो असा दावा या वेबसाईट निर्मात्‍यांचा आहे. वेबसाईटवर अनेक पर्याय देण्‍यात आले आहेत. पहिला पर्याय आहे मास्‍टर पासवर्डचा. यात आपण सर्व अकाऊंटसाठी एकाच मास्‍टर पासवर्डचा वापर करू शकता. दुसरा पर्याय आहे ऑटोमॅटिक फॉर्म भरणे. हा पर्याय निवडून तुम्‍ही योग्‍य आणि सुरक्षित पद्धतीने फॉर्म भरू शकता. तिसरा पर्याय आहे वन क्लिक लॉगइन, ज्‍याच्‍या मदतीने माऊसवर एक क्लिक करून तुम्‍ही अनेक अकाऊंट ओपन करू शकता. चौथा पर्याय आहे प्रोटक्‍ट डाटा. याच्‍या मदतीने तुम्‍ही सर्व डाटा इनक्रिप्‍ट करू शकता.


Www.infocus.cc इंटरनेटवर लेख, विविध साहित्य वाचायची आवड असणार्‍यांसाठी हे संकेतस्थळ एक चांगला पर्याय आहे. एखाद्या साइटवर वाचलेला लेख तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही तो इतर मित्रांना पाठवणार आहात. अशावेळी तो संपूर्ण लेख पाठवणे शक्य नसल्यास आपल्याला हवे असलेला काही हिस्सा पाठवायचा असल्यास हे संकेतस्थळ मदतीचे ठरते. आपण या संकेतस्थळावर त्याला लेखाचा यूआरएल अँड्रेस टाकावा. त्यानंतर जो महत्त्वाचा भाग तुम्हाला हायलाइट करायचा आहे त्याविषयीचा पर्याय निवडावा. या संकेतस्थळावर तुम्ही स्वत:चा लेख ही हायलाइट करू शकता. निवडलेला भाग वगळता इतर भाग हिस्सा गडद होऊन जाईल. यानंतर तयार झालेली नवी लिंक मित्रांना पाठवता येईल. मित्रांना हे पाठवल्यानंतर त्यांना फक्त हायलाइट केलेला हिस्सा दिसेल.


www.chordbook.com: तुम्हाला गिटार वाजवणे आवडत असेल आणि ते शिकण्याची इच्छा असेल तर कॉर्डबुक डॉटकॉम एक चांगला पर्याय ठरतो. पैसे खर्च न करता तुम्ही व्‍हर्च्‍युअल गिटार वाजवण्याचा आनंद घेऊ शकता. वेबसाइटवर दिलेल्या स्केल लिस्टमधून आपल्या आवडीचा कोणताही स्केल निवडा. या कॉर्डला आपल्या गिटारवर लोड करून प्रॅक्टिस करा.गिटार कशापद्धतीने ट्यून करायचे हे देखील शिकता येईल. याठिकाणी रॉक गिटारच्या टिप्स देखील मिळतात. गिटार शिकवण्यासाठी फोटो, व्हिडिओचा चांगला वापर करण्यात आला आहे. एकवेळ तरी भेट द्यावी अशी साइट.


www.musicsmasher.net: ऑनलाइन संगीत ऐकण्याची आवड असलेल्या लोकांसाठी इंटरनेट जगतात शेकडो पर्याय आहेत, परंतु जे गाणे ऐकण्याची तुमची इच्छा असते ते गाणे इंटरनेटवर किंवा एखाद्या संकेतस्थळावर मिळत नाही. असे नेहमीच होते. अशा वेळी म्युझिक स्मॅशर हे संकेतस्थळ तुमची मदत करू शकेल. हे संकेतस्थळ तुम्हाला संगीताचे प्रमुख संकेतस्थळ एकत्र करून सर्चचा पर्याय उपलब्ध करून देते.या संकेतस्थळांमध्ये आरडियो, स्पॉटिफाय, ग्रुवेशार्क, यू-ट्यूब, साउंड क्लाउड, एमओजी आणि बँडकँप यांचा समावेश आहे. तुम्ही तुमचे आवडते कोणतेही गाणे ऐकण्यासाठी म्युझिक स्मॅशर साइटवर जेव्हा जाल तेव्हा या सर्व संकेतस्थळातून निघालेले रिझल्ट
मिळतील. त्यानंतर त्या गाण्यावर क्लिक केल्यास गाणे सुरू होईल. या संकेतस्थळाचा इंटरफेस खूपच सोपा आहे. गाणे ऐकण्यासाठी तुम्हाला संकेतस्थळावर साइन-अप करण्याची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे सर्च करण्यापूर्वी ‘यूएस कॅटलॉक ओन्ली’चा पर्याय डिसेबल करा. यामुळे तुम्हाला एकाच वेळी अनेक रिझल्ट मिळतील.

www.commonfloor.com:
कॉमनफ्लोअर डॉट कॉम हे भारताचे पहिले रियल इस्टेट पोर्टल आहे. येथे तुम्हाला घर खरेदी करायचे असेल, विकायचे असेल, भाड्याने घ्यायचे असेल किंवा दुरुस्त करायचे असेल तर याबाबतची सर्व माहिती मिळेल. या संकेतस्थळाची सुरुवात 2007 मध्ये आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्या अभियंत्याने केली होती. संकेतस्थळाची सुरुवात एका रिकाम्या गॅरेजमधून झाली होती. आज येथे सर्वात जास्त अपार्टमेंटची यादी आहे आणि सर्वाधिक गेटेड कम्युनिटीसुद्धा याच संकेतस्थळावर रजिस्टर्ड आहे.येथे अपार्टमेंटच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली जाते. उदाहरणार्थ अपार्टमेंटची वैशिष्ट्ये, स्थळ नकाशा, बिल्डर प्रोफाइल, मालमत्तेची छायाचित्रे, शेजार्‍या-पाजार्‍यांचे प्रोफाइल, सोसायटीत राहणार्‍या इतर लोकांच्या मालमत्तेविषयी मत इत्यादी. तुम्हाला तुमच्या समुदायाशी संबंधित एखाद्या सोसायटीतच घर घ्यायचे असेल तर येथे यूनिक अपार्टमेंट कम्युनिटी प्लॅटफॉर्मसुद्धा आहे.
 
www.whitezine.com:  व्‍हाईटझाईन एक वेब मॅगझीन आहे. फोटोग्राफी, ग्राफिक्‍स किंवा व्हिडिओ कोणत्‍याही माध्‍यमातून कलेच्‍या बाबतीत सर्वकाही सांगते. हे संकेतस्‍थळ वेगवेगळया क्षेत्रातील कलावंत आणि त्‍यांच्‍या कलाकृत्‍यांवर प्रकाश टाकते. त्‍यामध्‍ये फॅशन, प्रॉडक्‍ट डिझाईन, ब्रँडिंग आणि वास्‍तुकलेचा समावेश आहे.
हे संकेतस्‍थळ 2009मध्‍ये सुरू झाले होते. सध्‍या त्‍याच्‍या वापरकर्त्‍यांमध्‍ये वाढ झाली आहे. डिझाईनच्‍या क्षेत्रात संदर्भसाठीही या संकेतस्‍थळाचा वापर केला जातो. तुम्‍ही प्रेरणा घेण्‍यासाठी काही शोधत असाल किंवा काही सुंदर व आकर्षक डिझाईन पाहिजे असतील तर हे संकेतस्‍थळ तुमच्‍यासाठी उपयुक्‍त आहे. तुम्‍हाला डिझाईन आवडत असेल किंवा स्‍वत: डिझायनर आहात तर हे संकेतस्‍थळ बुकमार्क करणे तुमच्‍यासाठी योग्‍य राहील. तसेच व्‍हाईटझाईन बातमीपत्रासाठी साईन-अप करू शकता, तर याद्वारे प्रेरणा घ्‍या, डिझाईन करा आणि ती शेअर करा.

www.resumonk.com: नोकरी शोधत असलेल्या व्यक्तींसाठी ही एक उत्कृष्ट साइट आहे. येथे तुमचा बायोडाटा एखाद्या प्रोफेशनल डिझायनरकडून फॉरमॅट करून घेऊ शकता. हे पूर्णपणे मोफत आहे. वेबसाइटवर साइनअप केल्यानंतर बायोडाटा संबंधित बॉक्समध्ये सर्व माहिती द्यावी लागते. वैयक्तिक, शिक्षण, अनुभव, इतर कार्य, कौशल्य, प्रोजेक्ट अशा स्वरुपात वेगवेगळी माहिती घेतली जाते. प्रत्येक वेळी सेव्ह अँड कंटीन्यू पर्यायाची निवड करत पुढच्या टप्प्यावर जावे. यानंतर पाच टॅम्प्लेटचा पर्याय दिला जातो. त्यापैकी एकाची निवड करावी लागते. यानंतर तुमचा आकर्षक बायोडाटा तयार होतो.

imo.in: नवे मित्र मिळवण्यासाठी किंवा मित्रांशी गप्पा मारण्यासाठी हे एक उपयुक्त संकेतस्थळ आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला आयएमच्या कोणत्याही नेटवर्कवर मित्रांशी गप्पा मारण्यासह नवे मित्र तयार करण्यासाठीसुद्धा आयएमओ नेटवर्क जॉइन करता येईल. सध्या एमएसएन, स्काइप, याहू मेसेंजर, गुगल टॉक, फेसबुक,एआयएम/आयसीक्यू, जॉबर, मायस्पेस, हाइव्स आणि स्टीम आयएमओच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट आहेत. तुम्हाला गप्पा मारण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल किंवा डाउनलोड करण्याची गरज नाही. हे संकेतस्थळ आयओएस आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार्‍या उपकरणांसाठीही उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्ही याद्वारे व्हीओआयपी म्हणजे वायस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलदेखील करू शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला थेट किंवा फेसबुक किंवा स्काइप किंवा इतर संकेतस्थळांना लॉग-इन आणि पासवर्डद्वारे लॉग-इन करता येईल. या संकेतस्थळावर लॉग-इन केल्यानंतर तुम्हाला ज्या नेटवर्कशी चॅट करायचे आहे ते नेटवर्क याच्याशी जोडावे लागेल.
 
www.shockwave.com: 1998 मध्ये सुरू करण्यात आलेली ही गेमिंग साइट दररोज आपल्या यूर्जसला ऑनलाइन गेमिंगचा अनुभव देते. 2006 एमटीव्ही नेटवर्क्‍सचा हिस्सा झालेल्या या साइटवर 1800 पेक्षा जास्त गेम्स आहेत. आणि प्रत्येक आठवड्याला यात नव्या गेमची भर पडत असते. ही एक अशी गेमिंग साइट आहे जी तुम्ही एकदा तरी पाहिली पाहिजे. या साइटवर टूडे फन, व्हिडिओ, फोटो, गेम्ससारखे आयकॉन आहेत. यावर क्लिक करून त्यासंदर्भात जाणून घेऊ शकता. बेवसाइटवर उपलब्ध असणारे गेम्स साइनअप न करता सुद्धा पाहू किंवा खेळू शकता. येथून गेम्स डाउनलोड देखील करता येते. साइटवर गेम्ससाठी दिलेले रेटिंग आणि ती रिलीज झाल्याची तारीख सुद्धा उपलब्ध असते. त्याचप्रमाणे किती यूर्जसनी ती खेळली आहे दे देखील जाणून घेता येते. आपल्या आवडत्याप्रकारानुसारगेमशोधता येतात.
 
 
www.followupthen.com: एखादी अपॉइंटमेंट किंवा कार्यक्रमाची आठवण ठेवण्यासाठी तुम्ही ई-मेलची मदत घेता काय? जर अशी मदत घेत असाल तर तुमच्यासाठी फॉलोअप वेबसाइट मदतीची साइट ठरेल. ही साइट तुम्हाला योग्यवेळी रिमाइंडर देईल. या साइटवर एकदा साइनअप केल्यानंतर पुन्हा साइटवर जाण्याची गरज भासत नाही. किती वेळ आधी तुम्हाला रिमाइंड करायचे हे एकदा सेट झाल्यावर त्या वेळी त्यासंदर्भात आठवण करून दिली जाते.
आपल्याला कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा रिमाइंडर हवा हे देखील साइटवर नोंद करता येते. या साइटवर साइन अप मोफत असून रिमाइंडरसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. व्यग्र वेळापत्रक असणार्‍यांसाठी ही साइट अत्यंत उपयोगी आणि वेळ वाचवणारी ठरते.
 
www.croak.it: रंजक अंदाजात मेसेज पाठवण्याची आवड असलेल्या लोकांसाठी हे उपयुक्त संकेतस्थळ आहे. ट्विटरवर ट्विट किंवा फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून मेसेज पाठवण्याऐवजी तुम्ही स्वत:च्या आवाजात संदेश पाठवण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करू शकता. या साइटवर व्हॉइस शेअरिंग सोल्युशन उपलब्ध आहे. त्यावर जाऊन तुम्ही ‘पुश टू क्रोक’ बटण दाबल्यावर हिरव्या रंगाचे बटण लाल होते. बटण लाल होण्याचा अर्थ रेकॉर्डिंग सुरू झाली आहे. आता तुम्ही तुमचा संदेश मायक्रोफोनच्या माध्यमातून बोलून रेकॉर्ड करू शकता.
तथापि, हा संदेश 30 सेकंदांपेक्षा जास्त नसला पाहिजे. रेकॉर्डिंग संपताच तुम्ही तो फेसबुक किंवा ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर, तसेच ई-मेल आणि ब्लॉगवर सहजपणे शेअर करू शकता. तुम्ही टेक्स्ट मेसेजलाकंटाळला असाल आणि काहीतरी नवीन करायचे असेल तर या संकेतस्थळाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा अत्यंत खासगी संदेश आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचवता येईल.
 
www.whitezine.com:  व्‍हाईटझाईन एक वेब मॅगझीन आहे. फोटोग्राफी, ग्राफिक्‍स किंवा व्हिडिओ कोणत्‍याही माध्‍यमातून कलेच्‍या बाबतीत सर्वकाही सांगते. हे संकेतस्‍थळ वेगवेगळया क्षेत्रातील कलावंत आणि त्‍यांच्‍या कलाकृत्‍यांवर प्रकाश टाकते. त्‍यामध्‍ये फॅशन, प्रॉडक्‍ट डिझाईन, ब्रँडिंग आणि वास्‍तुकलेचा समावेश आहे.
हे संकेतस्‍थळ 2009मध्‍ये सुरू झाले होते. सध्‍या त्‍याच्‍या वापरकर्त्‍यांमध्‍ये वाढ झाली आहे. डिझाईनच्‍या क्षेत्रात संदर्भसाठीही या संकेतस्‍थळाचा वापर केला जातो. तुम्‍ही प्रेरणा घेण्‍यासाठी काही शोधत असाल किंवा काही सुंदर व आकर्षक डिझाईन पाहिजे असतील तर हे संकेतस्‍थळ तुमच्‍यासाठी उपयुक्‍त आहे. तुम्‍हाला डिझाईन आवडत असेल किंवा स्‍वत: डिझायनर आहात तर हे संकेतस्‍थळ बुकमार्क करणे तुमच्‍यासाठी योग्‍य राहील. तसेच व्‍हाईटझाईन बातमीपत्रासाठी साईन-अप करू शकता, तर याद्वारे प्रेरणा घ्‍या, डिझाईन करा आणि ती शेअर करा.